अर्थविश्व

तेजीसह शेअर बाजाराची चढती कमान; सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले

वृत्तसंस्था

मुंबई - शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात तेजीसह बंद होण्यास यशस्वी झाला आहे. देशभरात लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अनलॉक-१ जाहीर केल्यानंतर उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.  मंगळवारी सकाळपासून गुंतवणूकदारांनी सुरू केलेल्या चौफेर खरेदीने बाजारात तेजीचे वातावरण होते. 

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२२ अंशांनी वधारून ३३,८२५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२ अंशांची वाढ झाली. तो ९,९७८ अंशांवर बंद झाला.

जागतिक पतमानांकन संस्था 'मुडीज'ने भारताचे मानांकनात घट केली आहे. मात्र, शेअर बाजारावर याचा परिणाम झाला नसून  गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी ओघ सुरू ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय उद्योग महासंघाच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील उद्योजकांना संबोधित केले. कोरोनामुळे संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

'अनलॉक-१' मुळे उद्योग-व्यवसाय पुन्हा कार्यान्वित होत आहे. बऱ्याच  दिवसांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. परिणामी विमान कंपन्यांच्या शेअर मंगळवारी वधारले. क्षेत्रीय पातळीवर बॅंक निफ्टी आणि ऑटो निर्देशांक बाजार सुरू होताच वधारले.  सेन्सेक्सच्या मंचावर आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे शेअर वधारून बंद झाले. 

शेअर वधारले:
एचडीएफसी, कोटक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक

शेअर घसरले
 मारुती सुझुकी, आयटीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर 

कच्च्या तेलाचे दर वधारले
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) कच्चे तेल २,७०६ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. तसेच जागतिक बाजारात क्रूड ऑईल दर ८८ सेंटने वधारून ३९.२० डॉलर प्रतिबॅरलवर पोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT